Sunday, August 4, 2019

सोपे आहे रे......!

मैत्री करने  सोपे आहे रे, ती सांभाळता आली पाहिजे, 
कारण  प्रवासात time pass करण्यासाठी 2 प्रवासी तात्पुरती मैत्री तर करून च घेतात पण जसा तो प्रवासी उतरतो तशीच  त्यांच्या मैत्री ची ज्योत  मात्र  विजूनच जाते. 
विश्वास मिळवणे सोपे आहे रे , तो टिकविता आला पाहिजे, 
कारण विश्वास हा काचा सारखाच, एकदा पडलेली भेग भरवता येत नाही .
प्रेम करणे सोपे आहे रे, पण प्रेमासाठी प्रेमाला विसरता आलं पाहिजे ,
कारण जर प्रेम मार्ग जरी गुलाबाचा असेल तरी बोचणा-या काट्यांना विसरून चालत नाही. 
उत्तर नसल्याने  शांत राहणे सोपे आहे रे, पण उत्तर असल्या वर शांत राहता आले पाहिजे, 
कारण शब्दाने शब्द वाढला तर कलह होतो अन्‌ शब्दाने शब्द समजला तर कलहा चा विराम होतो.
बोलून मन ओळखणे सोपे रे,पण डोळे बघून मन ओळखता आले पाहिजे,
कारण  बोललेला प्रत्येक शब्द खरा नसतो अणि डोळ्यातील अश्रूचा प्रत्येक भास हा खरा असतो . 
स्वप्न रेखाटने तर सोपे आहे रे, पण तेच स्वप्न सत्यात उतरवता आले पाहिजे, 
कारण स्वप्नाचे महल उभारायचे असेल तर सुरुवात मात्र पायापासून च करावी लागते .
 संधी मिळविणे तर सोपे आहे रे, मात्र संधीच सोने करता आले पाहिजे. 
कारण संधी तर नशिबाने पण मिळते पण संधीचं सोनं आणि सोन्याचं नाणं करायला कर्म च लागतं.
 खोटे पचविणे सोपे आहे रे , पण सत्याला सामोरे जाता आले पाहिजे ,
कारण सत्याने धैर्याची परीक्षा होते,,आणि तेही परिणाम!चि अपेक्षा न करता.....💓

Tuesday, March 12, 2019

कदाचित म्हणूनच माझ्याकडे आज शब्द नाहीत.....

प्रयत्न करते कि बांधेल कवितेच्या या ओळींमध्ये तुम्हाला पण तुमची ती image मांडायला  आज माझ्याकडे शब्द  नाही....
आई  तर सांगुन मोकळी होते नात्यांची जाळे पण त्यांना कितपत सांभाळायचे धडे  तुम्ही न बोलता च सांगून दिले म्हणून कदाचित माझ्याकडे आज लिहायला शब्द नाहि....
माहिती नाही का मारलेली घट्ट मिठी चा गोडवा, अणि प्रेमाने बोललेले दोन मांडायला
आज  माझ्याकडे शब्द नाहीत....
मान्य करते नारळा सारखे आहात तुम्ही
पण त्यामधील मऊपणा दाखवायला तुम्हाला शब्दांची गरज कधी पडलीच नाही .. आणि कम्हणून च   माझ्याकडे  आज शब्द नाही...
कोणी असो वा नसो पाठीशी माझ्या, तुम्ही मात्र नेहमीच राहाल याचा विश्‍वास नाही तर अति विश्‍वास आहे मला, आणि कदाचित या गर्वा मूळे च आज माझ्या कडे शब्द नाही.....
रागावणे समजावणे तर चांगलेच बघितले मी पण बालपणी, पण आता ते तर कधीच बंद झाल, म्हणून कदाचित माझ्याकडे ते मांडायला ही शब्द नाही...
निघता घरून पाणावतात डोळे दोघांचेही, पण ते लपवायला कधी च जागा सापडत नाही, आणि म्हणूनच आज माझ्या कवितेला शब्द नाहीत..
मनातल प्रेम व्यक्त करायला मात्र
आज माझ्याकडे शब्द नाहीत....
मिटवून डोळे मी आठवते रोजच,
पण भेटल्यावर लगेच बोलायला शब्द सापडत नाही...
धडे हिमतीचे  घेतले मी, पण घेता निर्णय आजही चुकते मी, पण तुमचे ते मार्गदर्शन
मांडायला आज माझ्याकडे शब्द नाही....
कोहिनूर तुम्ही माझ्या आयुष्यातील, पण त्याची अनमोलता  सांगायला आज माझ्या कडे शब्द नाहीत....
कधी सांगितले नाही काळजी किती तुम्हाला कदाचित म्हणून च आज माझ्या कडे ते मांडायला ही शब्द नाही....

Sunday, February 10, 2019

महफील थी या कोई किताब?

वो रात थी या कोई किताब,
रिहा हुए थे सारे  सवाल जवाब,
भविष्य मैं छाया हुआ था मन, 
पर न जाने क्यूँ घर बना रहा था बचपन। 
जाने थे नुस्खे किसीके और किसीके होस्ले । 
पहचाना था खुदको तब बाकी थे कुछ फैसले 
इस कदर सामने आयी कमियाँ ,
की पल को ही पूछ नी पड़ी थी अपनी कुछ खामियां ।
ना जाने कैसे और कब आयीं भाड़,
उदासी छाई सबके आड़।
मन में थे जो ख्वाब बूंदे, 
हो रहे थे कुछ धुँधले। 
कुछ हसीं खुशी के बाद, 
आ रही थी गलतीयां  याद। 
 भर आयी थी ये अखियां, 
जब याद आयी घर की गलियां।।
हम तो अभी भी उलझें थे अपनों मै,
पर बताना था हम तो काफ़ी सुलझे है सपनों मै।
बड़े दिन बाद जो हम पाच की महफील जमी थी,
कुछ आसू , कुछ बातें तो सामने आने ही वाली थी ।
कुछ बता  रहे थे, और कुछ छुपा रहे थे, 
बताने वाले को मजबूत और छिपाने
वाले को कमजोर बता कर 3 बजे की महफिल तो बर्खास्त हो गई थी।
पर मानो  सुनसान  रात भी  हमे  और सुनना चाहती थीं,
 हमे दर्द से रिहा और खुद को बेहतर बनाना चाहतीं थीं।