मैत्री कसा छोटासा शब्द आहे न ..... अगदी दोन अक्षरांचा पण तेवढं च नव्हे तर त्यामागे दडलेल्या हजारो अनगिनात भावनेचा ...... कधी प्रेम तर कधी काळजी .... कधी हक्काचा राग तर कधी रागाचा हट्ट ...... कधी आलेले आनंदाश्रू तर कधी एकमेकांचे बघितले न जाणारे अश्रू .... कधी न थांबणारी बडबड तर कधी सहन न होणारा अबोला .....
आयुष्याच्या या वेगवेगळ्या वळणावर अनोळखी व्यक्ती भेटतात . वेगळे विचार ,वेगळे राहणीमान ,वेगळ्या आवडीनिवडी ,वेगळ्या वाटा . वाटा बदललेल्या तरी मैत्री मात्र बदलत नाही . ऋतू बदलतात तसेच लोक हि बदलतात पण जसे पळसाला पाने तीनच असतात तशीच खरी मैत्री असते कधीही न बदलणारी .
कधी सुखात तर कधी दुःखात साथ न सोडणारी .
मैत्री म्हणजे काळजाने काळजाशी केलेलं नातं ...... काही वेळा जगाची बंधने स्वीकारून तर काही वेळा जगाची बंधने तोडून स्वतःच्या बंधनाचे उदघाटन करणारी मैत्री च असते . कधी जीव लावणारी ,कधी मौजमजेत हरवून जाणारी ,आयुष्याचे वेगवेगळे धडे शिकवणारी मैत्रीच ,रक्ताचे नाते जरी नसले तरी ऋणानुबंधाची नाळ जोडणारी मैत्री च असते ..
कधी भूतकाळात तर कधी भविष्यात रमवणारी मैत्री जेव्हा अबोला करते न तेव्हा त्रास होतो ,कळत न कळत आपली आता तशी मैत्री राहिली नाही असं जेव्हा कोणी तरी बोलून जात न तेव्हा डोळ्यात अश्रू यायला वेळ लागला तरी मनात मात्र अश्रूच तुफान उठतं , समोरच्याशी नजर मिळवून बोलण्याची पण शक्ती त्यावेळी नसते ....... नक्कीच भीती असते काहीतरी अनमोल गमावण्याची .........
"मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वाराअसतो ,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो ,
"मैत्री "हा असा खेळ आहे जो दोघांनीहि खेळायचा असतो .
एक बाद झाला तरी
दुसर्याने डाव सांभाळायचा असतो . "
Great jaggu
ReplyDeleteThanks shubhu 😊
DeleteEk number...
ReplyDeleteTy...
DeleteMaitrichi vyakhya khupch chan shabdat mandli jagruti.
ReplyDelete