Thursday, December 20, 2018

मैत्रीचं प्रेम रहस्य..

तो विचारतो तिला सांग ना आपली मैत्री कशी?
ति हळूच सांगते.... आपली मैत्री....
अनगिनत गुपितांची, शेकडो भावनेची
जशी  मैत्री प्रश्नांची उत्तराशी.
तशीच तुझी आणि माझी...
जगाला  न कळणारी,
एकमेकांना गहिवरून देणारी
अशी मैत्री तुझी आणि माझी
पाखरांची आकाशाशी , डोळ्यांची  क्षितिजाशी.
जशी मैत्री  मनाची an हृदयाची
तशीच तुझी आणि माझी...
जशी फुलांची व काट्याची
जशी चंद्र ताऱ्यांची
तशीच तुझी आणि माझी
जशी गरज कवितेला शब्दांची
शब्दाला भावनेची..
तशीच तुला  माझी
अश्रू बघताच काळजाच पाणी होणारी,
डोळे बघताच मन ओळखणारी,
अशी मैत्री तुझी आणि माझी.
जसा बागेत दरवेळेला सुगंध
जसा रातराणी चा तो गंध
तसाच तुझ्या - माझ्या मैत्रीचा बंध..
        ती म्हणते त्याला आता तू सांग आपल्या मैत्री ची व्याख्या.....
तो म्हणतो..
  मैत्री..... तर तुझ्यासाठी सखे माझ्यासाठी तर प्रेम आहे ग हे.
येताच कोणी आयुष्यात आयुष्य वेगळ्या वळणावर च वळल
जशी कृष्णाला राधा....
जशी  प्रियकराला प्रेयसी...
तशी मला तू....
तु म्हणजे नशिबाशी शर्यत,
अणि ती पण शेवटच्या श्वासापर्यंत.
तू म्हणजे n सुटणार कोडं,
तुझ्या आठवणी होते मन वेडं ,
तुझ रागावणं पण वाटते  गोड.
हवी मला  आयुष्यात तुझीच जोड .
स्वप्नात माझ्या फक्त तूच,
हवी आयुष्यात फक्त तूच.
पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत,
कळत  च नाही कधी मनाशी मन जुळत.
तसच मन जुळल माझ - तुझ..
जशी तुझी मैत्री माझ्यासाठी तसं प्रेम माझ तुझ्यासाठीच....💗
                                     

घर अणि हॉस्टेल.....

संस्कार मिळतात ते घर,
पन  आठवणी मिळतात ते होस्टेल.
जन्मोनुबंध घडवुन आणत ते घर.
मात्र ऋणानुबंध जुळवून आणणार होस्टेलच.
आपल्या लोकात गुंतवत ते घर,
पन गुंतलेले लोक आपले करतं ते होस्टेलच .
प्रेमाच्या चार भिंतीं म्हणजे घर,
मात्र नियमांच्या चौकटीत राहून खरं आयुष्य जगणे म्हणजे होस्टेल.
घर म्हणजे मायेची प्रेम सावली,
मात्र मैत्री चि प्रेम सावली म्हणजे होस्टेलच .
आवडता पदार्थ कब्जा करून एकटेच खाणे म्हणजे घर.
मात्र नआवडलेलं ही मिळुनमिसळून  खाणे म्हणजे होस्टेल.
जसे आहे तसे चालत राहणे म्हणजे घर,
पन दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलवणे म्हणजे होस्टेल.
परीक्षेच्या काळात टीव्ही वर लागलेला krfuee म्हणजे घर.
मात्र परीक्षेच्या काळात जमवलेली महफिल म्हणजे होस्टेल च .
लवकर झोपण्याची टांगती तलवार म्हणजे घर.
गप्पा गोष्टीत night मारत झालेली सकाळ म्हणजे होस्टेल च .
घराने तर मनं जुळविणे शिकवलं, पण मनं जुळविण्या सोबत च ते ओळखणे फक्त हॉस्टेल शिकवू शकलं .
असा हा प्रवास प्रेमाच्या चार भिंती पासून तर नियमांच्या चार भिंती पर्यंतचा....🏡💗🏨

Tuesday, September 11, 2018

मैत्री ....

                  मैत्री  कसा  छोटासा शब्द आहे न ..... अगदी दोन  अक्षरांचा पण तेवढं च नव्हे तर त्यामागे दडलेल्या हजारो  अनगिनात भावनेचा ...... कधी प्रेम तर कधी काळजी .... कधी हक्काचा राग तर कधी रागाचा हट्ट ...... कधी  आलेले आनंदाश्रू तर कधी एकमेकांचे बघितले न जाणारे अश्रू .... कधी न थांबणारी बडबड  तर कधी सहन  न होणारा  अबोला ..... 
                  आयुष्याच्या या वेगवेगळ्या वळणावर अनोळखी व्यक्ती भेटतात .  वेगळे विचार ,वेगळे राहणीमान ,वेगळ्या आवडीनिवडी ,वेगळ्या  वाटा . वाटा बदललेल्या तरी मैत्री मात्र बदलत नाही .  ऋतू बदलतात तसेच लोक हि बदलतात पण जसे   पळसाला पाने तीनच असतात तशीच खरी  मैत्री असते कधीही न बदलणारी . 
कधी सुखात तर कधी दुःखात साथ न  सोडणारी . 
                   मैत्री म्हणजे   काळजाने काळजाशी केलेलं नातं  ......  काही वेळा जगाची बंधने स्वीकारून तर काही वेळा जगाची बंधने तोडून स्वतःच्या बंधनाचे उदघाटन करणारी मैत्री च असते . कधी जीव लावणारी ,कधी मौजमजेत हरवून जाणारी ,आयुष्याचे वेगवेगळे धडे शिकवणारी मैत्रीच ,रक्ताचे नाते जरी नसले तरी ऋणानुबंधाची नाळ जोडणारी मैत्री च असते .. 
                   कधी भूतकाळात तर कधी भविष्यात रमवणारी मैत्री जेव्हा अबोला करते न तेव्हा त्रास  होतो ,कळत न कळत  आपली आता तशी मैत्री राहिली नाही असं जेव्हा कोणी तरी बोलून जात न तेव्हा डोळ्यात अश्रू यायला वेळ लागला तरी मनात मात्र अश्रूच तुफान उठतं , समोरच्याशी नजर मिळवून बोलण्याची पण शक्ती त्यावेळी नसते  ....... नक्कीच भीती असते काहीतरी  अनमोल गमावण्याची   ......... 
                 "मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वाराअसतो  ,
                    विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो  ,
                 "मैत्री "हा असा खेळ आहे जो दोघांनीहि खेळायचा असतो . 
                    एक बाद  झाला तरी 
                    दुसर्याने डाव सांभाळायचा असतो .  "