Sunday, August 4, 2019

सोपे आहे रे......!

मैत्री करने  सोपे आहे रे, ती सांभाळता आली पाहिजे, 
कारण  प्रवासात time pass करण्यासाठी 2 प्रवासी तात्पुरती मैत्री तर करून च घेतात पण जसा तो प्रवासी उतरतो तशीच  त्यांच्या मैत्री ची ज्योत  मात्र  विजूनच जाते. 
विश्वास मिळवणे सोपे आहे रे , तो टिकविता आला पाहिजे, 
कारण विश्वास हा काचा सारखाच, एकदा पडलेली भेग भरवता येत नाही .
प्रेम करणे सोपे आहे रे, पण प्रेमासाठी प्रेमाला विसरता आलं पाहिजे ,
कारण जर प्रेम मार्ग जरी गुलाबाचा असेल तरी बोचणा-या काट्यांना विसरून चालत नाही. 
उत्तर नसल्याने  शांत राहणे सोपे आहे रे, पण उत्तर असल्या वर शांत राहता आले पाहिजे, 
कारण शब्दाने शब्द वाढला तर कलह होतो अन्‌ शब्दाने शब्द समजला तर कलहा चा विराम होतो.
बोलून मन ओळखणे सोपे रे,पण डोळे बघून मन ओळखता आले पाहिजे,
कारण  बोललेला प्रत्येक शब्द खरा नसतो अणि डोळ्यातील अश्रूचा प्रत्येक भास हा खरा असतो . 
स्वप्न रेखाटने तर सोपे आहे रे, पण तेच स्वप्न सत्यात उतरवता आले पाहिजे, 
कारण स्वप्नाचे महल उभारायचे असेल तर सुरुवात मात्र पायापासून च करावी लागते .
 संधी मिळविणे तर सोपे आहे रे, मात्र संधीच सोने करता आले पाहिजे. 
कारण संधी तर नशिबाने पण मिळते पण संधीचं सोनं आणि सोन्याचं नाणं करायला कर्म च लागतं.
 खोटे पचविणे सोपे आहे रे , पण सत्याला सामोरे जाता आले पाहिजे ,
कारण सत्याने धैर्याची परीक्षा होते,,आणि तेही परिणाम!चि अपेक्षा न करता.....💓